फोंडाघाट येथे घरो-घरी तिरंगा जनजागृतीपर विविध उपक्रम

⚡कणकवली ता.१०-: कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्यालय आणि महाविद्यालयातील कक्षाकडून हर घर तिरंगा उपक्रमाला उत्साहपूर्ण लोकसहभाग मिळावा म्हणून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली.
     भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य व विभागीय सहसंचालक उच्च विभाग, कोकण विभाग, पनवेल आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या निर्देशनानुसार फोंडाघाट ग्रामपंचायत आणि फोंडाघाट ज्युनियर आणि सिनियर कॉलेज कडून  हर घर तिरंगा उपक्रमाला प्रचंड मोठ्या संख्येने लोकसहभाग मिळावा या मुख्य उद्देशाने फोंडाघाट बाजारपेठ मधून क्रांती दिनाचे औचित्य साधत स्वातंत्र्यवीर च्या वेशभूषा करत रॅली व संचलन करून जनजागृती करण्यात आली
 भारतीय स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत १३ ते १५ दरम्यान झेंडा फडकविण्याचे आहे असे ही या जनजागृतीतून सांगण्यात आले.
   स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाबाबत फोंडाघाट गांवातील  सर्व राहात्या घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन तसेच फोंडाघाट ग्रामपंचायतवर तीन कलरमध्ये विदुयत रोषणाई करण्याचे नियोजन फोंडाघाट ग्रामपंचायतद्वारे करण्यात आलेले आहे या बाबत जनजागृती करताना ध्वजारोहणा बाबतचे नियमाबाबत जनजागृती करण्यात आली
    या जनजागृतीत सरपंच संतोष आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व लोकप्रतिनिधी,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी,सर्व ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,फोंडाघाट हायस्कूल चे सर्व शिक्षक ,विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते

You cannot copy content of this page