साकेडी ग्रा.पं.च्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जनजागृती फेरी

विविध उपक्रमांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार

⚡कणकवली ता.१०-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत साकेडी ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने साकेडी ग्रामपंचायत लच्या माध्यमातून सरपंच रीना राणे, यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. हर घर तिरंगा अंतर्गत सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक शाळा साकेडी च्या विद्यार्थ्यां ची जनजागृती फेरी काढण्यात आली. तसेच सामूहिक राष्ट्रगीत गायन देखील करण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज बुधवारी साकेडी पावणादेवी मंदिराजवळ स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली. ग्रामपंचायतच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. यात 12 ऑगस्ट रोजी मोबाईल चे दुष्परिणाम याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर शाळेत गोपाळांची पंगत हा उपक्रम देखील राबवण्यात येणार आहे. 13 ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा व दुपारी तीन वाजता महिला मेळावा व समूहगान असे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 14 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण व किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण व त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. यासह अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने करण्यात आले असून, ग्रामस्थांनी देखील या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा असे आवाहन सरपंच सौ. राणे यांनी केले आहे. या उपक्रमाप्रसंगी उपसरपंच महंमद जहूर शेख, ग्रामपंचायत सदस्य मंगला जाधव, आनंदी परब, किशोरी तेली, आदिती राणे, ग्रामसेवक संजय तांबे, फराना शेख, मुख्याध्यापिका समिधा वारंग, आशा सेविका वैशाली गुरव, स्मिता मेस्त्री यांच्यासह अनेक महिला व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page