वेंगुर्ला प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त ऐतिहासिक स्थळ होळकर देवस्थान परिसर व महाविद्यालय परिसर स्वच्छता व सुशोभिकरण करण्यात आले.
या उपक्रमात लेप्टनंट डॉ.बी.जी.गायकवाड, एन.एस.एस.युनिट अधिकारी प्रा.एस.जी.चुकेवाड, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर व प्रा.व्ही.एस.चव्हाण, क्रिडा संचालक जे.वाय.नाईक, डॉ.आनंद बांदेकर, कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक डी.जे.शितोळे, विरेंद्र देसाई, प्रा.के.आर.कांबळे यांच्यासह एन.एस.एस., एन.सी.सी. तसेच इतर विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग घेतला.
महिला विकास कक्षातर्फे ट्रायकर युनिटी टॅन्गिलिग टाईल पेंटींग कार्यशाळा घेण्यात आली. यात १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भारताच्या छोट्या नकाशामध्ये झेटॅग्ल आर्ट या कला प्रकाराची चिन्ह वापरुन ६ इंची भारताचे चित्र रंगविण्यात आले व भारत देशाची महानता सांगून विविधतेतील एकतेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमावेळी डॉ.आनंद बांदेकर, डॉ.धनश्री पाटील, प्रा.एस.एस.दिक्षित, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.आर.जी.चौगले, सुरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
