भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त व कै. भाईसाहेब सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजन
*
⚡सावंतवाडी ता.१०-: शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडीच्यावतीने शनिवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच कै. नामदार भाईसाहेब सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाणार आहे.
ही स्पर्धा सिंधुदुर्गातील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असून या स्पर्धेसाठी ज्युनियर कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा संघ किंवा वैयक्तिक एका विद्यार्थ्याला सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी सांघिक विजेतेपद प्राप्त करणाऱ्याला फिरता चषक तसेच प्रथम क्रमांक रोख ३ हजार रुपये व चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक रोख २ हजार चषक व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रोख एक हजार चषक व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकाना रोख पाचशे व प्रमाणपत्र देण्यात येईल. या वक्तृत्व स्पर्धेत सिंधुदुर्गातील बहुसंख्य ज्युनियर कॉलेजनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, संस्थेचे सचिव व्ही बी नाईक सर, संस्थेचे खजिनदार सी एल नाईक सर, शालेय समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर सर, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक जे व्ही धोंड, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक- धुरी तसेच स्पर्धा समिती प्रमुख प्रा. केदार म्हसकर यांनी केले आहे.
