शिवसेना प्रवक्ते डॉ परुळेकर यांचा मंत्री विस्तारावर चिमटा
सावंतवाडी : चाळीस दिवसाच्या प्रदीर्घ प्रत्यक्ष नंतर शिंदे फडणवीस मंत्रीमंडळ भाजप युती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र सरकारने एकाही महिलेला मंत्री पद न देऊन महिलांचा मोठा सन्मान केला, असा टोला शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डाॅ.जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून लगावला. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यासह सर्व मंत्रांना महीला सबलीकरणाच्या वाटचालीस शुभेच्छा अशी खिल्लीही त्यांनी उडविली.
या प्रसिद्धीपत्रकात परुळेकर यांनी म्हटले की, जिजाऊमाता, सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर,मृणालताई गोरे,अहिल्याताई रांगणेकर, या रणरागिणीच्या पुरोगामी महाराष्ट्रात भाजप प्रणीत शिंदे सरकारने एकाही महिलेला मंत्रीपद दिले नाही, हा एकप्रकारे महिलांचा मोठा सन्मान आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सर्व मंत्र्यांना महिलांचा विशेष सन्मान व गौरव केल्याबद्दल धन्यवाद व पुढील पहिला सबलीकरणाच्या वाटचालीस शुभेच्छा असा टोला लगावला आहे.
