बांदा/प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून बांदा ग्रामपंचायतच्या वतीने बुधवार दिनांक १७ रोजी प्राथमिक, माध्यमिक व खुल्या गटात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यासंदर्भात बांदा ग्रामपंचायत कार्यालयात बैठक संपन्न झाली.
पाचवी ते सातवी या प्राथमिक गटात, आठवी ते दहावी या माध्यमिक गटात व खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे. गटानुसार बांदा कट्टा कॉर्नर ते पत्रादेवी सीमा हा मार्ग स्पर्धेसाठी ठेवण्यात आला आहे. ही स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटात होणार असून प्रत्येक गटातून प्रत्येकी तीन विजेते निवडण्यात येणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्वाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच अल्पपोहराची सोय करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नियोजन शिक्षक नंदू नाईक, कमलाकर धुरी, जे डी. पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. स्पर्धा सकाळी ८ वाजता सुरु करण्यात येणार आहे. विजेत्यांना त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता आनंदी मंगल कार्यालय येथे होणाऱ्या समारोप कार्यक्रमात पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रामविस्तार अधिकारी लीना मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, बाळू सावंत, राजेश विरनोडकर, जावेद खतीब, रिया आलमेडा, स्वप्नाली पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, महादेव वसकर, ज्ञानेश्वर सावंत, संदीप बांदेकर, नंदू नाईक, जे डी पाटील, राकेश केसरकर, कमलाकर धुरी, वर्षा आगलावे, कामिनी कुडव, श्री कदम, सौ. बावकर आदी उपस्थित होते. बांदा शहरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बांदा येथे १७ ऑगस्ट रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन…
