वरवडे उर्सुला स्कूल नजीक रोडवर आले पाणी
⚡कणकवली ता.०८-: कणकवली तालुक्यात गेले तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी आचरा मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. तसेच काही काळ बिडवाडी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या 24 तासात तालुक्यात 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर तालुक्यात आतापर्यंत 2416 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान सोमवारी सकाळपर्यंत नुकसानीची नोंद नव्हती अशी माहिती महसूलच्या सूत्रांकडून देण्यात आली.
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसामुळे शेतीचे नुकसान होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
कणकवली तालु्यातील वरवडे येथील सेंट ऊर्सुला इंग्लिश स्कूलला पावसामुळे सुट्टी देण्यात आली होती.
