⚡मालवण ता.०८-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पेंडूर – खरारे ग्रामपंचायतीमार्फत दि. ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत पेंडूर खरारे ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, माजी सरपंच, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ माजी सैनिक मार्गदर्शन, १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शासकीय संस्था, देवस्थाने, शाळा, ग्रामपंचायत येथे स्वच्छता मोहीम, दुपारी ३ वाजता महिला मेळावा व महिला बचतगट मार्गदर्शन, ११ ऑगस्ट रोजी शाळा स्तरीय कार्यक्रम, १२ ऑगस्ट रोजी ग्रामस्थ महिला व बचत गट यांना मार्गदर्शन, १३ ऑगस्ट अंगणवाडी स्तरीय कार्यक्रम तसेच शेतकरी मेळावा व सेंद्रिय शेती कार्यक्रम, १४ ऑगस्ट वृक्षारोपण कार्यक्रम, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ : ३० प्रभातफेरी, ८:३० वाजता ध्वजारोहण व देशभक्तीपर कार्यक्रम, १६ ऑगस्ट रोजी शालेय स्पर्धा, किशोरी मेळावे व सांस्कृतिक कार्यक्रम, १७ ऑगस्ट रोजी सांगता समारोह, स्वराज्य फेरी व चित्रपट सादरीकरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तर या कार्यक्रमात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामपंचायत खरारे पेंडूरचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
