सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे आयोजन
मालवण : (प्रतिनिधी)
ऑगस्ट क्रांतिदिन चे औचित्य साधून सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण यांच्या वतीने मामा वररेकर नाट्यगृह मालवण येथे दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. शिल्पा खोत यांनी केले आहे.
