बांदा मराठा समाजाच्या वतीने १४ व १५ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य

बांदा/प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून बांदा मराठा समाजाच्या वतीने १४ व १५ ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात मराठा समाजाचे अध्यक्ष बाळू सावंत व महिला अध्यक्षा स्वाती सावंत यांनी माहिती दिली.


रविवार दिनांक १४ रोजी सकाळी १० वाजता येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, शाहिद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता तसेच ३० हुन अधिक कुटुंबियांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे अच्युत भोसले, सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले, माजी पोलीस उपायुक्त दयानंद गवस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी महिला मराठा भगिनींचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी बांदा शहरात होणाऱ्या भव्य प्रभातफेरीतील सहभागी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाबाबत समाजात जनजागृती करणे तसेच प्रत्येक घरावर झेंडा फडकविण्यासाठी समाजामार्फत सहकार्य करण्यात येणार असल्याचे बाळू सावंत यांनी सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव म गो सावंत, सहकार्यवाह राजेश सावंत, उपाध्यक्ष आनंद गवस, दीपक सावंत, विराज परब, स्वप्नील सावंत, रत्नाकर आगलावे, जे डी पाटील, निलेश देसाई, विकी कदम, माधवी गाड, अरुणा सावंत, अवंती पंडित, सुचिता मुळीक, लक्ष्मी सावंत आदिसह मराठा समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page