श्रीलोचन आश्रमातील छोट्या मुलींनी पोलिसांना बांधल्या राख्या

झाडांचे संरक्षण करण्याचे पोलिसांकडून घेतले वचन

बांदा/प्रतिनिधी
पुणे येथील श्रीलोचन आश्रमातील छोट्या मुलींनी स्वतः राख्या बनून पोलिस कर्मचाऱ्यांना बांधल्या. यावेळी झाडाचे संरक्षण करून नव्याने झाडे लावू, असे अभिवचन उपस्थित पोलीस भाऊरायांकडून घेण्यात आले. कोकण कला व शिक्षण विकास संस्था संचलित श्रीलोचन बालविकास केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.


कोकण कला व शिक्षण विकास संस्था संचलित श्रीलोचन बालविकास केंद्रातील लहानग्यांनी या वर्षी ५०० पेक्षा जास्त राख्या बनवून समाजातील वंचित, दिन दुबळे, समाजातील असे लोक ज्यांना लोकांनी आनंद साजरा करावा म्हणून सण साजरा न करता येत नाही, जसे की कडक पहारा देणारे, साफसफाई कामगार अशा अनेक बांधवांबरोबर एक वेगळा असा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन अंकित दत्तनगर पोलिस चौकी येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक अंकुश कचरे, पोलिस हवालदार प्रविण पाटील, पोलिस गाईड कंचप्पा जानराव आणि अमर भोसले आदी पोलिस बांधव उपस्थित होते. आश्रमातील मुलींनी या बांधवाना ओवाळून रक्षाबंधन तर साजरे केलेच पण प्रत्येकी 5 सिड बॉल गिफ्ट म्हणून देऊन ‘झाडे लावू झाडांचे रक्षण करू’ असे वचन या भाऊ रायांकडून घेतले. या वेळी मुलींना भेट म्हणून चॉकलेट, फ्रूटी आणि झाडांचे रक्षण करू असे वचनही पोलिस बांधवांनी दिले.
जंगल वाढीसाठी अशा प्रकारे अभिनव कल्पना राबवत असल्याबद्दल महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाक्षी कचले यांनी संस्थेचे कौतुक केले. त्याचबरोबर आज या चिमुकल्या बहिणींनी अक्षरस्पर्श मतिमंद निवासी वसतिगृहातील मुलांनाही राखी बांधून भेट म्हणून मुलींनी पाच झाड लावण्याचे वचन मागितले. या कार्यक्रमाचे नियोजन कविता धूम, प्रीती पांगे आणि नागेश पवार यांनी केले.
फोटो :-
पुणे येथे पोलीस बांधवाना राख्या बांधण्यात आल्या.

You cannot copy content of this page