⚡कणकवली ता.०४-:
जतन हे पुस्तक म्हणजे नवीन आणि जुन्या आठवणी,संस्कार ,संस्कृतीचे जतन आहे, जतन म्हणजे जिवंत अनुभव साध्या सरळ शब्दातील अभिव्यक्ती आहे असे डॉ. चंद्रकांत पुरळकर यांनी सांगितले.
कणकवली येथे नागपंचमी दिवशी हा पुस्तक प्रकाशन सोहळा डॉ. चंद्रकांत पुरळकर यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी
प्रमुख उपस्थिती प्रदीप श्रावणकर, अनिल कदम,शशिकांत कदम आणि विवेकानंद सावंत आणि वैशाली तावडे उपस्थित होते.
यावेळी विशाखा सावंत यांनी विचार मांडताना सांगितले,मी जे पाहिले ,अनुभवले ते मी लिहीत गेले ,चांगले आणि वाईट ही, त्यातून मलाच एक आनंद मिळत होता,मुळात पुस्तक छापण्याच हेतू नव्हता ,अनेकांच्या प्रोत्साहनामुळे लिहिण्याचा हुरूप वाढला,पुस्तकाच्या निर्मितीत मुलगे, सूना आणि पती विवेकानंद त्याचप्रमाणे कुटुंब आणि डॉ. पुरळकर यांची प्रेरणा यामुळे हे शक्य झाले, त्यांनी सर्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन संदीप पेंडूरकर यांनी केले.
