वेंगुर्ले रोटरॅक्टचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न…

रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी रोट. प्रितीश लाड यांची निवड

⚡वेंगुर्ले ता.०४-: रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथी कॉलेज वेंगुर्ला यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. ह्या सोहळ्यास पदग्रहण अधिकारी म्हणून डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह रोट. अनिकेत जाधव लाभले होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पी. एच. एफ., पी. डी. आर. आर., रोट. साहिल गांधी, पी. डी. आर. रोट. ऋषिकेश जाधव, आय. पी. डी. आर. रोट. विशाखा पेडणेकर मॅडम, डी. सी. सी. रोट. राजेश घाटवळ उपस्थित होते.
यावर्षी सिंधुदुर्ग झोनच्या झेड. आर. आर. पदी रोट. दुर्गेश सुरेश पाटिल याची निवड करण्यात आली. रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी रोट. प्रितीश लाड तर सचिवपदी रोट. निकीता निनावे यांची तर रोटरॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथी कॉलेज वेंगुर्लाच्या अध्यक्षपदी रोट. सर्जिल कर्जिकर तर सचिवपदी रोट. अलिशा खानव रोट. कोमल जगाडे यांची नियुक्ती करण्यात आली.
या सोहळ्यासमयी रोटरॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथी कॉलेजच्या “आधार” या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच रोट. घाटवळ सरांच्या मार्गदर्शनाखाली “एज्युकेअर” ह्या उपक्रमाचे देखील उद्घाटन गरजू मुलांना वह्यांचे वाटप करुन करण्यात आले. तसेच रोट. श्वेता हुले मॅडम यांचा “वेटलँड चॅम्पियन्स” पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रात सिंधुदुर्ग झोन मधील सर्व रोटरॅक्ट क्लबसाठी झोनल ओरिएंटेशनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे रोटरॅक्ट्रर्स उपस्थित होते. तसेच डिस्ट्रिक्ट ३१७० चे रोट. हर्ष, रोट. प्रिथ्यूश दोशी,रोट. शुभम जाधव, रोट. चैतन्य निळकंठान्वर, रोट. नरेन आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page