कणकवली तहसील कार्यालय परिसर स्वच्छतेची जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केली पाहणी

⚡कणकवली ता.०४-: जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कणकवली तहसीलदार कार्यालयाला भेट दिली.कणकवली तहसीलदार कार्यालय परिसर स्वच्छता त्याचप्रमाणे परिसर सुशोभीकरण उपक्रमाबद्दल तहसीलदार आर.जे.पवार व सहकाऱ्यांचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कौतुक केले आहे.


आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे.कणकवलीत झेंडा वाटप जनजागृती अभियान शुभारंभ कणकवली पंचायत समिती येथे पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर,उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे,प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी भेट देत पाहणी केली.यावेळी तहसीलदार आर.जे.पवार,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,नायब तहसीलदार शिवाजी राठोड, मंडळ अधिकारी पाटील आदींसह महसूल कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सदरचा उपक्रम लोकसहभागातून होत असून जनतेचे चांगले सहकार्य मिळत असल्याने अशा प्रकारचे काम उभे राहत असल्याची माहिती तहसीलदार आर.जे. पवार यांनी दिली.

You cannot copy content of this page