पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी मालवण पंचायत समितीला राज्य स्तरावर मानांकन…

*💫मालवण दि.२४-:* केंद्र स्तरावरील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२१ या पुरस्काराच्या राज्य स्तरासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव असे मालवण पंचायत समितीला नामांकन प्राप्त झाले आहे. उच्चतम गुणांकन प्राप्त पंचायत राज संस्थांच्या राज्यस्तरीय पडताळणी करता राज्यस्तरीय समितीकडून २४ व २५ जानेवारीला मालवण पंचायत समितीची पडताळणी व तपासणी होत आहे. केंद्र स्तरावरील हा पुरस्कार असून या पुरस्कारासाठी राज्य स्तरावर मालवण पंचायत समितीच्या पहिल्यांदाच मानांकन मिळाले आहे. गेल्या काही वर्षात सातत्याने मालवण पंचायत समितीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. अनेक योजना तळागाळात पोहोचवल्या. माजी गटविकास अधिकारी तथा जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर व विद्यमान गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्यासह सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटनेते सुनील घाडीगांवकर व सर्व सदस्य तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी मालवण पंचायत समितीला आदर्शवत बनवण्यात व नावलौकिक वाढवण्यात मोलाची भूमिका बजावला. एकूणच पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी मिळालेले मानांकन ही एक मोठी गोष्ट असून मालवण पंचायत समितीसाठी हाच एक सन्मान असल्याची भावना सभापती अजिंक्य पाताडे यांनी व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page