तारकर्ली ग्रामस्थांचा इशारा
मालवण-: कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेली तारकर्ली ग्रामपंचायतीची ग्रामसभा त्वरित आयोजित करण्यात यावी अन्यथा २६ जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा तारकर्लीचे ग्रामस्थ व श्री साई सेवा समाज कल्याण मंडळ तारकर्लीचे अध्यक्ष भिवाजी कोळंबकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन भिवाजी कोळंबकर यांनी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांना सादर केले आहे. तारकर्ली ग्रामपंचायतीची ग्रामसभा कोरोना महामारी मुळे पुढे ढकलण्यात आली होती. गावातील विविध प्रश्न व समस्यां मांडता याव्यात तसेच विकासाच्या दृष्टीने ग्रामस्थांच्या मागण्या मांडता याव्यात यासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक असल्याने ग्रामसभा त्वरित घेण्यात यावी अशी मागणी भिवाजी कोळंबकर यांनी केली आहे. ग्रामसभा आयोजित न केल्यास मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणास बसू असा इशारा भिवाजी कोळंबकर यांनी निवेदनातून दिला आहे.
