निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार…

*सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

*💫बांदा दि.२४ -:* सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘मान कर्तृत्वाचा, सन्मान नेतृत्वाचा’ राज्यस्तरीय पुरस्कार मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांना सिंधुदुर्ग जिल्हा भूषण सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुदास गवंडे यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी अध्यक्ष यादवराव पावसे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिवराव लोखंडे, ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, भाऊ मरगळे, विक्रम भोर, हरीप्रिया शुगरचे अध्यक्ष जयदिप वानखेडे, कार्यकारी संचालक बाळासाहेब निकम, स्वागताध्यक्ष सरपंच प्रदीप हासे, सरपंच रविंद्र पवार उपस्थित होते. महाराष्ट्रात सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कार्यरत राहून सरपंच यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यावर सरकार सोबत सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्रात उपक्रम राबवून सरपंच यांना एक आधार म्हणून सरपंच सेवा संघ कार्य करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श गावे निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करून महाराष्ट्रात काही गावे निवडुन ग्रामविकासाचे काम गावोगावी जाऊन सुरू करण्याचा संघाचा मानस आहे. यंदाचे राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श सरपंच, उद्योग भूषण, पत्रकारीता, युवारत्न, प्रशासकीय सेवा, सामाजिक भूषण, शैक्षणिक, कोरोनायोध्दा, मिडीया, कृषी, व्यापार, कला, राजकीय, महसुल, वैद्यकीय, अध्यात्मिक, ऐतिहासिक, दिव्यांग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुत्रसंचालन प्रा. सोनाली म्हरसाळे, युवराज सातपुते यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते शरदराव देवकाते यांनी केले.

You cannot copy content of this page