शिरंगे येथे धम्ममित्र परेश जाधव यांचे मार्गदर्शन
दोडामार्ग :
‘ संस्कृतीतुन संस्काराची निर्मिती होते; म्हणून आपले कुटुंब संस्काराचे केंद्र बनले पाहिजे, त्यासाठी आपले मंगल दिन व सण याची माहिती असणे फार महत्वाचे आहे’, असे प्रतिपादन प्रवचनकार धम्ममित्र परेश जाधव यांनी शिरंगे येथील वर्षावास कार्यक्रमात केले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग यांच्या वतीने रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे (पुनर्वसन )येथे बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष आयु. अर्जुन कदम, सचिव एम. बी. कदम, संस्कार विभाग सचिव श्रीधर जाधव, संतोष हेवाळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षावास कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रवचनकार आयु. परेश जाधव यांनी ‘बौद्धांचे सण व मंगल दिन ‘या विषयावर प्रवचन दिले. सुरुवातीला भगवान बुद्ध आणि प. पू. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुध्दवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वर्षावास कार्यक्रमाचे प्रस्ताविक एम. बी. कदम यांनी केले तर आभार अर्जुन कदम यांनी मानले.
या कार्यक्रमात शिरंगेतील विनोद कदम, भिकाजी कदम, विठ्ठल कदम, प्रकाश कदम, अमोल कदम, अमृता कदम, प्रियांका कदम तसेच महिला बचत गटाच्या सदस्य व मुलांची बहुसंख्य उपस्थिती होती. हा वर्षावास कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद कदम व भिकाजी कदम ईत्यादींनी अधिक प्रयत्न केले.
