माजी पालकमंत्री उदय सामंत गाडी हल्ला प्रकरण सखोल चौकशीची गरज: शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर
सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे झालेला हल्ला हा शिवसेनेकडून झाला की सहानभूती मिळविण्यासाठी त्यांच्याच कडून करून घेण्यात आला याची माहिती मिळविण्यासाठी या हल्ल्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
