शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा वापर

कारवाईचा आदित्य ठाकरे यांनी केला निषेध

⚡कुडाळ ता.०१-: पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राज्यभरात शिवसेनेकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही ‘शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे’ असं म्हणत ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहे. आज सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा निघणार आहे. चिपी विमानतळावर मोठ्या जल्लोषात आदित्य ठाकरेंचं स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला.

संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे, ईडीकडून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

You cannot copy content of this page