प्रो कबड्डीमध्ये निवड झाल्याबद्दल प्रणय
राणेचा कणकवली नगराध्यक्षांनी केला सत्कार

⚡कणकवली ता.०१-: प्रो कबड्डी मध्ये यु मुंबा संघातून कणकवली तालुक्यातील जानवली गावचे सुपत्र प्रणय राणे यांची निवड झाल्याबद्दल कणकवली शहराच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रणय राणे यांचा सत्कार केला . तसेच त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
कणकवलीचे नाव राज्यात चमकल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी गटनेते संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, राजू गवाणकर, विशाल डांमरी, राजा पाटकर, व्यंकटेश सावंत, सागर राणे, बाबू आर्डेकर, ओमकार राणे आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page