आ वैभव नाईक यांनी दिले “त्या”टीकेला उत्तर;राणेंकडे विकासाचे व्हिजन नसल्याचही केला आरोप
⚡सावंतवाडी ता.३०-: नारायण राणे हे केंद्राच्या मंत्रीपदावर आहेत. त्यांनी जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आतापर्यंत किती निधी आणला आणि दिड वर्षात किती रोजगार उपलब्ध करून दिले याचा विचार नितेश राणे यांनी करावा. मंत्रिपद मिळविण्यासाठी उगाचच शिवसेनेवर टीका करून चर्चेत राहू नये. असा हल्ला आमदार वैभव नाईक यांनी चढवला आहे.
परंतु, नितेश राणेंना मंत्रिपद मिळो अथवा न मिळो त्याचा कोणताही परिणाम जिल्ह्यावर होणार नाही. त्याच्याकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नसल्याचे टीका आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणेंवर केली आहे.
दरम्यान मंत्रीपदासाठी आपल्या वडीलांचा फोटो वगळून आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्याची वेळ नितेश राणेंवर आली आहे. यापेक्षा दुर्दैव काहीच नाही, असाही चिमटा त्यांनी काढला. याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. नाईक बोलत होते.
