सावंतवाडीत निष्ठा यात्रेतमध्ये शिवसैनिकांनी उपस्थित राहावे

आमदार वैभव नाईक यांचे आवाहन : येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची खरी ताकद दाखवून देऊ

सावंतवाडी ता.३०-:

सावंतवाडी मतदारसंघ आज पर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. त्यामुळे निष्ठा दाखविण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जनतेला भेटण्यासाठी सावंतवाडीत येत असून, या निष्ठा यात्रेत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, भाजप सोबत गेलेले बंडखोर आमदार हे भीती पोटी गेले असून, ते आजही शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहेत. आज पर्यंत शिवसेनेचे काम आम्ही वडापाव खाऊन केले असून, कोणाचीही बिर्याणी खाली नाही. असा टोला देखील आमदार दीपक केसरकर यांना लगावला आहे. दरम्यान कोणीही कोणत्याही पक्षात गेले तरी देखील शिवसेना कुठेही कमी पडणार नसून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची खरी ताकद दाखवून देऊ असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

You cannot copy content of this page