चिपी विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत करणार

युवासेना प्रमुखांच्या दौऱ्यासाठी कणकवली मतदारसंघ युवा सेनेचे नियोजन

⚡कणकवली ता.३०-: राज्याचे माजी पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे 1 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्या दरम्यान युवासेना कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कणकवली विधानसभा युवासेना पदाधिकारी चिपी विमानतळ येथे उपस्थित राहत त्यापुढे दौऱ्यात सहभागी होणार आहेत. या दौऱ्याचे नियोजन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने कणकवली विधानसभेच्या वतीने कार्यकर्त्यांसोबतच युवासैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शिवसैनिक, युवासैनिकांनी या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी याप्रसंगी केले. यावेळी उपतालुकाप्रमुख राजू राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, समन्वयक राजू राठोड, ऍड. चेतन पाटील, उत्तम लोके, राजन म्हाडगुत, उत्तम सावंत, शहरप्रमुख आदित्य सापळे, विलास गुडेकर, तेजस राणे, शरद सरगले, महेश कोदे, विश्राम सावंत, व्यंकटेश वारंग, आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page