अनिल चव्हाण यांचा विभागीय नियंत्रकांना इशारा
आंबोली,ता.३०: परिवहन विभागाच्या विभागीय नियंत्रकांनी तात्काळ आंबोली विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करावी अन्यथा २ दिवसात विभागीय कार्यालयासमोर पालकांसह उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी दिला आहे.
आंबोली येथील महाविद्यालयीन विद्यार्थी सावंतवाडी येथील महाविद्यालयात जातात.मात्र महाविद्यालय सुरू होऊन अनेक दिवस झाले तरी बस नसल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक मोठे नुकसान होत आहे.सावंतवाडी आगारातून आपल्याकडे बस उपलब्ध नाही. टायर घालण्यासाठी बस उभ्या आहेत.असे कारण सांगण्यात येत आहे.त्यामुळे मोठी गैरसोय झाली आहे.येथील आमदार दीपक केसरकर सध्या मंत्रिपदासाठी मतदारसंघातून गायब आहेत त्यामुळे इथल्या समस्यांकडे त्यांचे लक्ष नाही.त्यामुळे एस टी च्या कणकवली येथील विभाग नियंत्रक यांनी तात्काळ दखल घेवून एस टी आंबोली च्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी सर्व कारणे बाजूला ठेवून.अन्यथा पालकांसह विभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी दिला आहे.
