रत्नागिरी कुणकेश्वर फेरीचें देवगड बसस्थानकावर स्वागत

⚡देवगड ता.२८-: रत्नागिरी रापम विभाग मार्फत सुरू करण्यात आलेल्या रत्नागिरी पावस नाटे मार्गे पडेल कॅन्टीन जामसंडे मार्गे देवगड कुणकेश्वर या सागरी मार्गावरून सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी प्रवासी फेरीचें देवगड बसस्थानकावर आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले यांनी पुष्पहार घालून चालक वाहक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.व पेढे वाटप करण्यात आले.

या वेळी वाहतूक नियंत्रक लक्ष्मण (तात्या )खरात ,अमित रावले,आर पी जाधव,बबन जाधव,सामाजिक कार्यकर्त्या प्रगती तेली सेवानिवृत्त चालक श्री भडसाळे अन्य प्रवासी उपस्थित होते. या प्रवासी फेरीवर रत्नागिरी चालक टी. एच.वरूटे,महिला वाहक आर डी. हरचकर यांनी सेवा बजावली रत्नागिरी कुणकेश्वर ही प्रवासी फेरी गुरुवार दि.२८ जुलै पासून कायमस्वरूपी सुरू करण्यात आली असून स.७.३० वा. ती रत्नागिरी येथून देवगडला सागरी मार्गाने १०.१५ वा पोहचते
सदर प्रवासी फेरी देवगड बस स्थानकावर १०.३० वाजता पोहोचेल व कुणकेश्वर येथे ११ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरता सदर फेरी दुपारी २.३० वाजता कुणकेश्वर येथून व देवगड येथून ३.०० वा.पडेल जैतापूर पावस मार्गे रत्नागिरी कडे रवाना होणार आहे. तरी या प्रवासी फेरीचा फायदा प्रवाशांनी घ्यावा. असे आवाहन रत्नागिरी रापम विभाग च्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रवासी फेरी करीता विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर सामाजिक कार्यकर्ते भास्कर बर्वे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

You cannot copy content of this page