देवगड पंचायत समिती सदस्यपदाचे आरक्षण जाहीर…

देवगड (प्रतिनिधी)
देवगड पंचायत समितीच्या १६ गणांपैकी ८ गण महिला करीता राखीव झाले असून शिरगाव पंचायत समिती गण (३२)हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झाला आहे.या बरोबरच दाभोळे प.स.गण (३५)व पुरळ प.स.गण (२६)नामाप्र महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झाला आहे.देवगड पंचायत समितीच्या १६ गणांकरिता आरक्षण सोडत निवडणूक आयोगाने आदेशानुसार उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अधिपत्याखाली देवगड तहसीलदार मारुती कांबळे,नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,वरिष्ठ सहाय्यक श्री वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत देवगड तहसीलदार कार्यालयात काढण्यात आली .
या सोडतीत देवगड तालुक्यातील भाजप, शिवसेना ,या प्रमुख पक्षाच्या दिगग्ज नेत्यांना धक्का बसला आहे.यात भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य ,शिवसेना तालुका प्रमुख,याना आणखी पाच वर्षे उमेदवारीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आरक्षण सोडत शालेय विद्यार्थिनी चैतन्या तुषार पांचाळ हिच्या हस्ते काढण्यात आली ती पुढीलप्रमाणे
अनुसूचित जाती महिला -शिरगाव प.स.गण(३२),
नामप्र महिला – पुरळ,प.स.गण (२६)दाभोळे(३५)-प.स.गण
,नामाप्र प्रवर्ग – नाडण,प.स.गण(३३) पडेल,प.स.गण(२७)
सर्वसाधारण महिला -कुवळे,प.स.गण(३८) महाळुंगे, प.स.गण(३१),विजयदुर्ग प.स.गण(२५), बापर्डे प.स.गण(२८), मोंड,प.स.(३४)
सर्वसाधारण ,प्रवर्ग – पोंभुर्ले,प.स.गण(२९) गोवळ,प.स.गण(३०) कुणकेश्वर,प.स.गण(३६) किंजवडे,प.स.गण(३७) मिठबाव प.स.गण(२९), मुणगे प.स.गण(४०) याप्रमाणे आहे.
राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उदासीनता या वेळी दिसून आली .यावेळी
शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम काँग्रेस तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर ,भाजपा तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर ,माजी सभापती,रवींद्र जोगल,माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, माजी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य वर्षा पवार माजी सरपंच सुभाष शेट्ये,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुरेश देवगडकर तालुका सेक्रेटरी सजाउद्दीन सोलकर,वगळता अन्य पदाधिकारी यांनी या आरक्षण सोडतीकडे पाठ फिरविल्याचे निदर्शनास आले.

You cannot copy content of this page