माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलगाव जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सावंतवाडी… उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांना आज शिवसेना सावंतवाडी तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी शिवसेना महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांनी सहकार्य केले. या जिल्हा परीषद शाळेतील ८१ विद्यार्थ्याना रेनकोट व स्कूल बॅग वाटप करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना महीला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांनी शिवसेना ८०टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करते हे विषद केले. मुलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी अभ्यास, मेहनत कशी आवश्यक आहे याचे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच वर्षा वरक, उपजिल्हा प्रमुख (कक्ष) प्रशांत कोठावळे ह्यांनी देखिल मार्गदर्शन केले. या प्रसंगी सरपंच वर्षा वरक, उपजिल्हा प्रमुख (कक्ष) प्रशांत कोठावळे, विभाग प्रमुख नामदेव नाईक, विद्या कांडारकर, केदू शेळके, विठू शेळके, सखाराम कुंभार, रुपेश जाधव, महेश जाधव, रामा कोकरे, सचिन चव्हाण, पवन परब,मुख्याध्यापक सौ, मुनानकर, शिक्षक नितीन सावंत आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या शैक्षणिक दर्जा विषयी समाधान व्यक्त केले. आभार प्रदर्शन विभाग प्रमुख नामदेव नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page