⚡कणकवली ता.२८-: सामाजिक बांधिलकी जपत शिवप्रतिष्ठान कोळोशीच्या वतीने तांबे एज्युकेशन सोसायटी करंजे येथील मतिमंद विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवप्रतिष्ठान कोळोशीचे अध्यक्ष मंगेश जाधव , उपाध्यक्ष अतुल गुरव, विकास इंदप ,सचिव सिध्देश मेस्त्री, खजिनदार मारुती कदम,कार्यवाहक विजय ईळकर,दत्ताराम अमृते, चारुहास इंदप, गुरू सावंत, गणेश मेस्त्री,गणेश कदम, अनंत शेलार, संतोष इंदप, संतोष माळवदे,चंदू शिंदे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कायम सामाजिक उपक्रम राबवून क्रीडा, शैक्षणिक,सा़स्कृतिक उपक्रमांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपत विविध सार्वजनिक ठिकाणी श्रमदानातून आदर्शव्रत काम करणा-या शिवप्रतिष्ठान कोळोशीच्या वतीने करण्यात आलेल्या मदतीबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
शिवप्रतिष्ठान कोळोशीच्यावतीने मतिमंद विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
