जानवली, कळसुली सर्वसाधारण, तर कलमठ मध्ये महिला

कणकवली पंचायत समिती आरक्षण सोडतीत अनेकांना “धक्का”

⚡कणकवली ता.२८-: कणकवली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आरक्षण सोडत कणकवली तहसीलदार कार्यालयात अध्यासी अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राधिकृत अधिकारी तहसीलदार आर जे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांच्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

या सोडती प्रसंगी कणकवली तालुक्यातील पंचायत समितीच्या 9 गणातील 18 सदस्यांकरिता ही सोडत पार पडली. यामध्ये 9 सदस्य हे महिला तर 2 अनुसूचित जाती त्यापैकी एक स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 4 पैकी 2 स्त्री तर सर्वसाधारण एकूण 12 पैकी 6 स्त्री अशी आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेली गावांचे नाव वाचन करण्यात आले. यामध्ये कलमठ व सांगवे अनुसूचित जाती साठी राखीव ठेवण्यात आली तर यात चिठ्ठी टाकून कलमठ अनु जाती महिला साठी राखीव आरक्षण पडले. ना.मा. प्र आरक्षण सोडत काढत असताना खारेपाटण, फोंडा, हरकुळ खु, सावडाव ना.मा. प्र साठी राखीव ठेवण्यात आली. तर चिठ्ठीद्वारे यातून 2 महिला जागा राखीव ठेवण्यात आल्या. यात खारेपाटण, सावडाव गण ना.मा. प्र महिला राखीव झाले. सर्वसाधारण स्त्री राखीव मध्ये – लोरे, वारगाव, कासार्डे, नांदगाव, ओसरगावं, नाटळ, हे पंचायत समिती गण राखीव ठेवण्यात आले. अनारक्षित पंचायत समिती गणांमध्ये हरकुळ बु, वरवडे, वागदे, तरळे, जानवली, कळसुली या गणांचा समावेश आहे. उपस्थितांचे आभार तहसीलदार आर.जे .पवार यांनी मांनले. तर कणकवली तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक सौ. आडारकर यांच्या कन्या सृष्टी सुरेश नाईक या विद्यार्थिनीने आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या.

You cannot copy content of this page