जिल्‍हा तेली समाज मेळाव्यात विविध गुणवंताचा सत्‍कार

⚡कणकवली ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज मंडळाचा जिल्‍हा मेळावा ओरोस येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात झाला. यात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या तसेच दहावी, बारावी आणि विविध स्पर्धा परीक्षांत उल्‍लेखनीय यश मिळविलेल्‍या गुणवंतांचा सत्‍कार झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा तेली समाज मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली होते. तर मंचावर दशरथ कवठकर, बापू तळवडेकर, आबा तेली, तुकाराम तेली, निलेश कामतेकर, सुप्रिया वालावलकर, परशुराम झगडे, सुनिल नांदोस्कर, प्रकाश डिचोलकर, बाळ आजगांवकर, दिलीप तिवरेकर, राजन आचरेकर, दत्ताराम हिंदळेकर, नरहरी तेली, रमेश चव्हाण, चंद्रकांत तेली आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दहावी परीक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाविलेल्या समृद्धी शेट्ये, चैताली बिडवाडकर, हर्ष वायंगणकर, शुभम तिवरेकर, रिद्धी तळगांवकर, चारुशिला मोंडकर, सानिका देवगडकर यांना गौरव करण्यात आला. बारावी परीक्षेत ८० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या सानिका डिचवलकर, दिव्या तेली, पल्लवी दाभोलकर, तुषार कुवळेकर, ओम तेली, ऐश्वर्या तेली, तर पदवीधरांमध्ये लिना तळवडेकर व रोशन रविकांत चांदोस्कर तसेच राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघात निवड झालेल्‍या निनाद वेंगुर्लेकर यांनाही शुभेच्छा देण्यात आल्‍या.
विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणारे भिकाजी तेली (गुणवंत कर्मचारी), गणेश वसंत तेली (सरपंच बांबुळी), लाकडी तेलघाणा व्यवसाय सुरु केल्याबद्दल रमाकांत पेडणेकर, काशिनाथ पेडणेकर, संतोष तेली, कौस्तुभ तेली, कौशिक तेली व अमित गजानन तेली यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना संसर्ग कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या सुप्रिया संतोष वालवलकर यांचा सन्मान करण्यात आला. समाजसेवेसोबत भाविकता जपणारे परशुराम झगडे, राजन आचरेकर (मालवण अध्यक्ष), मंगेश शेलेकर (मालवण सचिव), दत्ताराम हिंदळेकर (कणकवली अध्यक्ष), अरविंद वायंगणकर (सचिव कणकवली), शैक्षणिक देणगीदार गुरुदास तेली यांचाही सत्कार करण्यात आला .

तेली समाज मंडळाच्या उत्कर्षासाठी अविरत काम करत असलेबद्दल अध्यक्ष श्री लक्ष्मण तेली व सचिव चंद्रकांत तेली यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमित धामापूरकर, साईनाथ आंबेरकर, प्रशांत आजगावकर, शैलेंद्र डिचोलकर, प्रकाश काळसेकर, चंद्रकांत कुवळेकर यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page