मालवण पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत चा कार्यक्रम आज मालवण तहसील कार्यालयात प्रांताधिकारी सौ. वंदना खरमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंचायत समितीच्या १४ जागांसाठी शासन निर्देशानुसार लोकसंख्या, प्राधान्य क्रम या आधारे तसेच काही जागांसाठी चिठी काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. यात १४ पैकी ५० टक्के जागा म्हणजेच ७ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

या आरक्षण सोडत कार्यक्रमाची कार्यवाही प्रांताधिकारी सौ. खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अजय पाटणे यांनी केली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, चिटणीस महेश मांजरेकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती अशोक बागवे, संतोष कोदे आदी व इतर उपस्थित होते. यावेळी कौशल प्रतीक जाधव या लहान मुलाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

जाहीर झालेले आरक्षण पुढील प्रमाणे-
अनुसूचित जाती (महिला) – आडवली- मालडी, नागरिकांचा मागास प्रवर्ग – सुकळवाड, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – शिरवंडे, मसुरे -मर्डे, सर्व साधारण महिला – पेंडूर, चिंदर, कोळंब, वराड, सर्वसाधारण खुले – चौके, कुंभारमाठ, पोईप, आचरा, गोळवण, वायरी भूतनाथ

दि. २९ जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर जाहीर झालेल्या आरक्षणावर दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करावयाच्या आहेत.

You cannot copy content of this page