मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेची पालक- शिक्षक संघ सर्वसाधारण सभा संपन्न

सभेत पालक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर

⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ- : मळगांव इंग्लिश स्कूल मळगावं प्रशालेची पालक- शिक्षक संघाची सन 2022-23 या वर्षाची सर्वसाधारण सभा हायस्कूलच्या चिंतन, हेमंत, शैलजा परब सभागृहात पार पडली. या सभेत सन 2022-23 व 23-24 या पुढील दोन वर्षांसाठी पालक शिक्षक संघ नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दीपक जोशी, पालक शिक्षक संघ माजी उपाध्यक्ष पंतवालावलकर, पर्यवेक्षक एम. बी. फाले,शिक्षक ओमप्रकाश तिवरेकर, एस. पी. ठाकरे, एन. एस. गोसावी, बी. बी. सावंत, व्ही. आर. सावंत,
सावंत भोसले मॅडम, पी. एम. मातोंडकर, एस. एस. परुळकर, ,ए. जी. मोर्ये, एस. आर. कारीवडेकर, पी. व्ही. केसरकर, पत्रकार सुखदेव राऊळ व पालक उपस्थित होते. मागील दोन वर्ष कोरोना कालावधीत सभा न झाल्याने या कालावधीत दिवंगत झालेल्या माजी शिक्षक, पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामस्थ व दिवंगत माजी विद्यार्थी यांना सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वप्रथम इयत्ता दहावी शालांत परीक्षा मार्च 2022 परिक्षेत प्रशालेतून प्रथम आलेल्या पार्थ प्रशांत राऊळ, द्वितीय आलेल्या सेजल बापू शिरोडकर व तृतीय आलेल्या प्रणव प्रवीण गोसावी यांच्या मातांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सन 2022-23 व 23-24 या पुढील दोन वर्षांसाठी पालक शिक्षक संघ नूतन कार्यकारिणी बनविण्यात आली. ही कार्यकारिणी पालकांमधून निवडण्यात आली. यात इयत्ता पाचवीस्वाठी सुहास पेडणेकर, इयत्ता सहावीसाठी संजना पेडणेकर, सातवीसाठी विद्याधर मांजरेकर, आठवी अ वर्गासाठी शीतल राऊळ, आठवी ब वर्गासाठी परशुराम गोसावी, नववी अ वर्गासाठी स्नेहल पारकर, नववी ब वर्गासाठी नेहा नाटेकर, दहावी अ वर्गासाठी सुषमा जाधव व दहावी ब वर्गासाठी रामचंद्र देवळी यांची निवड करण्यात आली. तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून इयत्ता पाचवीसाठी गोसावी मॅडम, इयत्ता सहावी साठी बी. बी इयत्ता सातवीसाठी सावंत भोसले, इयत्ता आठवी अ साठी ठाकरे,आठवी ब साठी मातोंडकर, नववी अ साठी कारीवडेकर, नववी ब साठी तिवरेकर , दहावी अ साठी आसोलकर मॅडम, दहावी बी साठी व्ही. आर. सावंत यांची नवी कार्यकारिणी निवडण्यात आली. या नूतन कार्यकारिणीला मान्यवरांच्यावतीने शुभेच्छा व पाठिंबा देण्यात आला. सभेत शाळेतील संगणक, फी शिक्षण निधी शालेय कामकाज, शिक्षण विकास निधी, इमारत देखभाल, वीज बिल आदीच्या पूर्ततेसाठी दिवसाला दिड रुपये याप्रमाणे वार्षिक 500 रुपये एवढा निधी पालकांकडून घेण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेऊन त्याला सर्वानुमते मंजुरीही देण्यात आली. यावेळी पालकांच्यावतीने गुरुपौर्णिमा निमित्ताने मुख्याध्यापक व शिक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेच्या प्रवेशद्वारासमोर शाळा भरताना आणि सुटताना संभाव्य असलेले अपघात टाळण्यासाठी प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्याबाबच्या पालकांनी मांडलेल्या सूचनेनुसार विचार घेण्यात आले व पालकांनी आपल्या मुलांना ये-जा करणे, एसटी प्रवास करताना शिस्तीचे पालन करावे, अनोळखी खाजगी वाहनाने प्रवास करु नये आदी दक्षतेच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष मनोहर राऊळ यांनी आवश्यक सूचना तर आसोलकर मॅडम यांनी विविध शालेय उपक्रम, केसरकर सर यांनी चित्रकला स्पर्धा, कारीवडेकर सर यांनी आरोग्य विषयक, व्ही. आर. सावंत यांनी इयत्ता पाचवी ते दहावी मुल्यमापन बाबत माहिती दिली. तसेच उपस्थित पालकांनी विद्यार्थी-विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी, संगणक पुस्तके देण्याबाबत सूचना मांडल्या. प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत यांनी तर आभार फाले सर यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन व देखरेख सेवक बाळा जाधव, प्रयोगशाळा परिचर विलास जाधव व सेवक व्ही. आर. भांडे यांनी केले.

You cannot copy content of this page