पक्षात दगाबाजी करणाऱ्या केसरकर यांनी शिंदे गटाच्या प्रवक्ते पदाला तरी प्रामाणिक राहावे…

प्रविण भोसले;पुन्हा टीका केल्यास गप्प बसणार नाही…

⚡सावंतवाडी ता.१४-: केसरकर यांच्या मनात शरद पवार यांच्याबदल असलेला राग ते बाहेर काढत असून, शरद पवार यांच्यावर टीका कर आहेत. मुख्यमंत्री सारखे व्यक्ती आज शरद पवारांचा मी आदर करतो असे सांगत असताना केसरकरांनी टिका करणे चुकीचे आहे. त्यामुळे केसरकर यांनी केलेल्या टिकेच निषेध करतो असे भोसले म्हणाले ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना भोसले म्हणाले की दिपक केसरकर यांनी या आदी किती पक्षात दगाबाजी केली आहे. त्यामुळे केसरकर यांना सर्व जण ओळखून आहेत. त्यामुळे आता शिंदे गटात ते प्रवक्ते म्हणून आहेत. त्या पदाला तरी त्यांनी प्रामाणिक राहवे असा टोला यावेळी लगावला आहे.

तसेच यापुढे केसरकर यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली तर राष्ट्रवादी गप्प बसणार नाही. असा ही इशारा प्रविण भोसले यांनी दिला आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, संतोष जोईल, इफ्तेहार राजगुरू आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page