बळीराजासाठी एक दिवस उपक्रमाअंतर्गत इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडे चे विद्यार्थी बांधावर…

⚡बांदा ता.१४-: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची आर्थिक व्यवस्थाच शेतीवर अवलंबून आहे. शालेय विद्यार्थ्यांना शेतीकामाची माहिती व्हावी यासाठी ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमातर्गत इंग्लिश मिडीयम तळवडे स्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बांधवर जाऊन शेती करण्याचा अनुभव घेतला.

प्रशाले नजीक शेतात जाऊन विद्यार्थ्यांनी नांगरणी, लावणी ही कामे केलीत. तसेच शेतकऱ्यांकडून शेतीविशयक कामांची माहिती घेतली. यावेळी भात लावणीचे प्रत्यक्षिकही विद्यार्थ्यांनी केले. स्थानिक शेतकऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत भातशेती कशी करावी, लावणी करण्याचे तंत्र, शेती संबंधित इतर कामे, आधुनिक शेती पद्धती व उपलब्ध उपकरणे, तसेच शासनाच्या त्यांना लाभत असलेल्या योजना याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक अजय बांदेकर व इतर सहकारी शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमाला संस्थेच्या संचालिका मैथिली नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page