इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडे येथे गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरी…

बांदा/प्रतिनिधी
इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे येथे गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला प्रार्थना व श्लोक म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना मानवंदना दिली. त्यानंतर गुरु या विषयावर विद्यार्थ्यानी भाषणे दिली.
मुलांनी एक छोटीसी नाटिका सादर करून त्याद्वारे गुरू आज्ञेचे महत्त्व सांगितले. सहाय्यक शिक्षिका श्रद्धा पायनाईक व प्रणिता मयेकर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वप्नाली तांबे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सौ. अंकिता पालकर यांनी मानले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक अजय बांदेकर, सहशिक्षक वसंत सोनुर्लेकर, दीक्षा नाईक, दर्शना देसाई, श्रीया माणगावकर, प्रियांका रेडकर आदी उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका सौ. मैथिली नाईक यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page