नारायण राणेंवर टीका करताना विचार करून करावी…

अन्यथा कपडे उतरल्याशिवाय राहणार नाही;संजू परबांचा केसरकरांना इशारा

⚡सावंतवाडी ता.१४-: बंडखोरी नंतर पहिल्यांदाच मतदार संघात येणाऱ्या केसरकरांन सोबत काल किती माणस होती ती पाहून आपली पात्रता केसरकर यांनी ओळखावी अशी टीका भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केसरकर यांच्यावर केली आहे. केसरकर यांनी राणेंवर टीका करताना विचार करावा अन्यथा कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संजू परब यांनी दिला आहे.

संजू परब पुढे बोलताना म्हणाले की केसरकर यांचे राजकारण हे संधी साधू आहे. लोकांना आणि नेत्यांना “मॅड” करून त्यांनी आपला स्वार्थ साधला आहे. त्यामुळे यापुढे त्यांनी राणेंवर टीका करताना भान ठेवून बोलावे, अन्यथा त्यांची “औकात” दाखवून देऊ, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. परब बोलत होते.

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, अजय सावंत, दिलीप भालेकर, अमित परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page