वाभवे – वैभववाडी शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांची अनोखी गुरुदक्षिणा
वैभववाडी प्रतिनिधी
आई ही प्रथम गुरु याचा प्रत्यय चक्क इवल्याशा बालकांनी दिला. गुरुपौर्णिमेनिमित्त मातांनचे व शिक्षकांचे पूजन केले तर बालकांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. वैभववाडी शहरातील जि. प दत्त विद्यामंदिर वाभवे वैभववाडी शाळा नंबर 1 मधील चौथी पर्यातचे बालकांनी हा अनोखा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला आई वडिलांना नमस्कार करून जीवनात अ आ इ ई चे धडे देणाऱ्या शिक्षक शिक्षिकेना व अंगणवाडी सेविकेना पुजा करून अभिवादन केले . यावेळी त्यांनी गुरू म्हणून आपल्या जीवनात सर्वप्रथम अक्षरांची ओळख करून देणाऱ्या गुरूंचे स्थान अढळ आहे. त्यांचे विद्यार्थी दशेत मिळाले मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळे आपली सामाजिक जडणघडण झाल्याचे कृतज्ञता व्यक्त करत नमस्कार केला. शाळेतील सर्व मुलांनी मातापुजनं केल. उपस्थित सर्व मातांना आपल्या जीवनात गुरुचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी मुख्याध्यापक सौ दिप्ती पाटील मॅडम, श्रीमंत सावंत मॅडम, अंगणवाडी सेविका पालक मोठे संख्येने उपस्थित होते.
