Headlines

ऐश्वर्य मांजरेकर यांची युनिसेफच्या सोशल मिडीया प्रशिक्षणासाठी निवड

⚡मालवण ता.१३-: नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग राष्ट्रीय स्वंयसेवक व मालवण तालुका समन्वयक ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची युनिसेफ द्वारे होणाऱ्या सोशल मीडिया प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे.

सदर प्रशिक्षण १४ ते १६ जुलै दरम्यान नवी मुंबई मध्ये पार पडणार आहे. नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यातील एका तरुणाची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे, यामध्ये सिंधुदुर्ग मधून ऐश्वर्य मांजरेकर याचा समावेश आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा ते सोशल मीडियाचा योग्य रीतीने वापर करून त्याचा समाजाला कसा फायदा होईल याची इत्यंभूत माहिती यामध्ये देण्यात येईल. जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी व लेखा व कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर यांनी ऐश्वर्य मांजरेकर याचे विशेष अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page