सौ विंदा जोशी स्मृती निमित्त तालुका व जिल्हास्तरावर होणार स्पर्धा
मालवण, दि प्रतिनिधी
मालवण येथील नगरवाचन मंदिरच्या वतीने ३१ जुलै रोजी नगरवाचन मंदिर येथे सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुकास्तर व जिल्हा स्तर अशा दोन गटात घेण्यात येणार आहे.
गट पहिला तालुकास्तर यात तालुक्यातील सर्व शाळांचे इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी माझा आवडता खेळाडू, माझा आवडता क्रांतिकारक, माझा आवडता लेखक हे तीन विषय देण्यात आले आहे. स्पर्धकाने यातील एका विषयावर वक्तृत्व सादर करायचे आहे. ही स्पर्धा ३१ जुलै रोजी सकाळी दहा वाजता होणार असून स्पर्धकाला पाच ते सात मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.
गट दुसरा जिल्हास्तरीय यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचे राजकारण, वर्षा ऋतु पर्यटन काय काळजी घ्यावी, वाचन संस्कृती आणि माझे योगदान हे तीन विषय देण्यात आले आहे. यातील कोणत्याही एका विषयावर वक्तृत्व सादर करायचे आहे. ही स्पर्धा ३१ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकाला आठ ते दहा मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.
तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी २८ जुलैपर्यंत नाव नोंदणी स्पर्धकांच्या भ्रमणध्वनी सहित ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत करायची आहे. स्पर्धेचा निकाल स्पर्धा समाप्तीनंतर लगेच देण्यात येईल. यशस्वी स्पर्धकाला रोख रक्कम व प्रशिस्तीपत्रक देण्यात येतील. परीक्षकांचा निर्णय सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल. अधिक माहितीसाठी संस्थेचे ग्रंथपाल संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदयराव मोरे व कार्यवाह नागेश कदम यांनी केले आहे.
