माजगाव सात जांभळी रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक रोखली

सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी झाड केले बाजूला

⚡सावंतवाडी ता.१३-: माजगाव सात जांभळी येथे रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने येथील वाहतूक काही काळ बंद झाली होती. याबाबतची माहिती सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते पदाधिकारी सुजित सावंत यांनी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांना फोन करून दिली असता. ते तात्काळ घटनास्थळी दाखल होत ते झाड बाजूला करून तो रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला.

त्यामुळे वाहनधारकांनी त्यांचे आभार मानले आहेत. ही घटना आज रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सतत कोसळणाऱ्या मूसळधार पावसामुळे हे झाड अचानक रस्त्यावर कोसळले असून, सुदैवाने दुचाकी चालक यात थोडक्यात बजावल्याने मोठी दुर्घटना टळली.

या मदत कार्य संजय पेडणेकर दीपक सावंत आदींनी सहभाग घेतला होता.

You cannot copy content of this page