⚡आंबोली, ता.१३ अनिल चव्हाण-: आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव राऊळ यांची पुणे येथील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ कोकण आघाडी अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. माजी आमदार आणि पुणे शहर अध्यक्ष जगदीश भाऊ मुळीक आणि वडगाव शेरी अध्यक्ष संतोष भाऊ लाला खांदवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निवड करण्यात आली.
श्री वैभव राऊळ हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून आंबोली परिसरात देखील त्यांचे कार्य आहे.क्रिकेट स्पर्धा असो किंवा सामाजिक कार्य असो किंवा मदत असो वैभव राऊळ हे सक्रिय पुढाकार घेतात.त्यामुळे अनेकांचा आशिर्वाद या युवकाने अल्पावधीत मिळवला आहे.वैभव राऊळ हे जन्माने सांगेली येथील असले तरी बालपणापासून आंबोली वासिय आहेत.
केसरी टूर्स मध्येही त्यांनी काही वर्षे काम केले.सामाजिक कार्याची आवड आणि गोरगरिबांची सेवा करून समाजात चांगले काहीतरी करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला.आणि अल्पावधीतच बाबली उर्फ वैभव राऊळ हे आंबोली, चौकुळ, गेळे येथील लोकांचे जवळचे एक सामाजिक नेतृत्व झाले.आणि राजकारणात ते सक्रिय झाले.तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांचे ते निकटवर्तीय.आणि डोंबिवली चे आमदार माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे जवळचे कार्यकर्ते.त्यांना सावंतवाडी आंबोली मंडळ भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पद दिलेले आहे आणि आता पुणे येथील वडगाव शेरी विधान सभा कोकण आघाडी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.याबद्दल त्यांचे पुणे येथील तसेच आंबोली पंचक्रोशी मधून अभिनंदन करतात येत आहे.
