युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठायात्रेत आम.वैभव नाईक सहभागी

⚡कणकवली ता.१३-: युवासेनाप्रमुख व राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे गेले चार दिवस मुंबईमध्ये निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेमध्ये फिरत असताना, या निष्ठा यात्रेला मुंबईच्या जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निष्ठा यात्रेत कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक हे देखील सहभागी झाले.

शिवसेनेला जनतेचे मुंबईत अजूनही भरभरून प्रेम आहे. ज्या ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी भेटी दिल्या त्या ठिकाणी जनतेने तासनतास थांबून आदित्य ठाकरे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. जरी काही आमदार शिवसेनेला सोडून गेले असले तरी आजही जनता व शिवसैनिक मात्र शिवसेने सोबत आहेत. त्यामुळे हाच प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रभर मिळेल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page