‘फोर जी’ ,’थ्री जी’ च्या युगातही गुरुजींचे
स्थान श्रेष्ठ:डॉ. राजेन्द्रकुमार चौगुले

कणकवली महाविद्यालयात गुरूगौरव सोहळा

⚡कणकवली ता.१३-: गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु ,गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरुवे नमः असा गुरु बद्दल आदर व्यक्त केला जातो. प्रत्येकाला कुणी ना कुणी गुरु हा असतोच.माणूस हा प्रत्येक टप्प्यावर काही ना काही शिकत असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर क्षणाक्षणाला भेटणाऱ्या व्यक्तींकडून आपण काही ना काही शिकत असतो. अशा असंख्य गुरूंना वंदन करण्यासाठी कणकवली महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने गुरु गौरव हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साजरा करण्यात आला.

यावेळी विचारमंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर प्रा. डॉ. सोमनाथ कदम व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. युवराज महालिंगे उपस्थित होते .
या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेन्द्रकुमार चौगुले म्हणाले की, “आपल्या आयुष्यात पहिलं गुरूच स्थान हे आईचं असते.आज गुरुकुलापासून कुलगुरूपर्यंत गुरूंचे रूप बदललेले आहे. असे असतानाही आज गुगल गुरुजी, व्हाट्सअप गुरुजी फोर जी, फाय जी या तांत्रिक काळातही गुरुचे महत्व कमी झाले नाही. यावरून गुरु शिष्याचे नाते किती अबाधित आहे याचाच प्रत्यय आपल्याला आजही येतो”.
याप्रसंगी प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा.डॉ. सोमनाथ कदम ,प्रा.डॉ. मारोती चव्हाण ,प्रा.दिपा तेंडोंलकर व विद्यार्थी वर्गातून मयुरी राऊळ, वेदिका दुखंडे,रसिका बाईत व सुजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नम्रता पाटील व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. बी. एल.राठोड यांनी केले. गुरु पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी सर्व गुरुज गुलाब पुष्प देऊन गुरुजनांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व प्राध्यापक ,विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page