⚡वेंगुर्ला ता.१३-: जगभरातील विविध संकटावेळी रोटरी नेहमीच सामाजिक जाणिवेतून आपली भूमिका व जबाबदारी पार पाडीत असते. जगातील पोलीओ निर्मूलनासाठी भरीव योगदान हा त्यातीलच एक उपक्रम आहे. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनने वेंगुर्ल्यात समाजपयोगी विविध उपक्रम राबवून समाजात रोटरीचे कार्य उल्लेखनीय आहे हे जनतेस दाखवून दिलेले आहे. त्याप्रमाणे समाजपयोगी महत्त्वाचे उपक्रम रोटरी क्लबच्या नवीन पदाधिकारी व कार्यकारीणीने राबवावेत, असे प्रतिपादन शपथ पदानाधिकारी रोटरी क्लबचे भावी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांनी रोटरी क्लबच्या पदग्रहण कार्यक्रमात केले.
साईमंगल कार्यालयातील डिलक्स हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे नुतन अध्यक्ष सुनील रेडकर, उपाध्यक्ष राजू वजराटकर, सचिव पंकज शिरसाट तर खजिनदार नितीन कुलकर्णी यांचा पदग्रहण कार्यक्रम रोटरी क्लबचे भावी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांचे हस्ते व पमुख पाहुणे असिस्टंट गव्हर्नर दिपक बेलवलकर, निता गोवेकर, गव्हर्नर एरीया अॅड. प्रणय तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, फर्स्ट लेडी सकिना बोरसादवाला, मावळते अध्यक्ष सदाशिव भेंडवडे, सचिव सुरेंद्र चव्हाण, इंटरनॅशनल सर्व्हीस- राजेश घाटवळ, माजी नगराध्यक्ष तथा रोटरीचे पब्लीक ईमेज चेअरमन दिलीप गिरप, बोर्ड ऑफ डायरेक्टर (क्लब सर्व्हीस) संजय पुनाळेकर, रोटरीचे युथ सर्व्हीस- योगेश नाईक, रोटरी फाऊंडेशन- गणेश अंधारी, मेंबरशीप-सचिन वालावलकर, सर्व्हीस प्रोजेक्ट- पिटर रॉड्रीक्स, लिट्रसी-आनंद बांदेकर, स्पोर्टस-अनमोल गिरप, टीच अँण्ड वीन- आशिष शिरोडकर, अजित धारगळकर, पोलिओ- वसंतराव पाटोळे, व्होकेशनल सर्व्हीस-राजन गावडे, सार्जंट ऑफ आर्म- आशुतोष शिरोडकर व दिलीप शिताळे, दादा साळगांवकर, विनय सामंत आदी उपस्थित होते.
रोटरी इंटरनॅशनलच्या या वर्षच्या प्रेसिडेंट जेनिफर जोन्स यांनी दिलेल्या ईमँजीन रोटरी या यंदाच्या थीमप्रमाणे व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश उर्फ बबन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रोटरी वर्षात समाजाभिमुख विविध कार्यक्रम ‘दिल से‘ या थिमप्रमाणे घेण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनिल रेडकर यांनी या कार्यक्रमांत स्पष्ट केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वेंगुर्ला तालुक्याचा नावलौकिक वाढवणा-या दिलीप गिरप (उत्कृष्ट नगराध्यक्ष नॅशनल अवॉर्ड), सँड्रा फर्नांडस (फॉरेन्सिक सायन्स गोल्ड मेडल), तेजस मेस्त्री (एम ए-गायन-गोल्ड मेडल), स्नेहा नार्वेकर- (जलतरण विश्वविक्रम) व राजेंद्र निंबाळकर (चार्टर्ड प्रेसिडेंट दोडामार्ग), तसेच रोटरी परिवारातील राजेश घाटवळ (असिस्टंट गव्हर्नर २०२१-२२), विवेक शिरसाट- (जिल्हापरीषद गुणवंत कर्मचारी पुरस्कार), तन्वी शितोळे (उच्च माध्यमिक परीक्षेत विशेष प्राविण्य), अथर्व अंधारी (शालांत विशेष प्राविण्य), साईराज सामंत (उत्कृष्ट बॅडमिंटनपटू), आर्ची नाईक (सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च कांस्य पदक), दिक्षा तोंडवळकर ( उच्च माध्यमिक परीक्षेत जिल्ह्यात प्रथम), श्रृती पाटील (उच्च माध्यामिक परीक्षेत दिव्यांगमधून प्रथम) या सर्वांचा मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी नुतन रोटरी सदस्य म्हणून डॉ.राजेश्वर उबाळे, अॅड. प्रथमेश नाईक, मुकुल सातार्डेकर, मृणाल परब, दिपक ठाकूर, अक्षया गिरप, संदिपा रेडकर, अंकिता बांदेकर, विनायक चव्हाण यांना पीन लावून शपथ देण्यांत आली. या नुतन क्लबचा पदग्रहण सोहळ्यास विविध संस्थांचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी, इनरव्हील क्लब, रोट्रक्ट क्लब, लायनेस क्लब, नागरीक तसेच रोटरी सदस्य व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत सदाशिव भेंडवडे यांनी, पास्ताविक इव्हेंट चेअरमन आनंद बांदेकर, सुत्रसंचालन संजय पुनाळेकर व नितीन कुलकर्णी तर आभार पंकज शिरसाट यांनी मानले.
