जीवन जगायचे कसे ? हे गुरू शिकवतात

ध्रुवकुमार रानडे: भंडारी हायस्कूलमध्ये गुरू पौर्णिमा साजरी

मालवण (प्रतिनिधी)
जीवन जगत येणाऱ्या संकटांना सामोरे कसे जायचे किंबहुना जगायचे कसे याचे मार्गदर्शन हा गुरू करीत असतो म्हणून भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान हे नेहमीच उच्च राहिले आहे गुरुमुळेच आपली प्रगती होत असल्याने जीवनात गुरुचे स्थान हे अलौकिक असेच आहे असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी ए सो हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री ध्रुवकुमार रानडे यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे माजी शिक्षक श्री. ध्रुवकुमार रानडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन सरस्वती माता व व्यास मुनींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून संस्थेचे लोकल कमिटीचे खजिनदार जॉन नरोना, मुख्याध्यापक वामन खोत, पर्यवेक्षक हणमंत तिवले, शिक्षक आर. बी. देसाई ,ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक श्री. खोत यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक करत गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे महत्व विशद केले. यावेळी मार्गदर्शन करताना ध्रुवकुमार रानडे यांनी पौराणिक व संत कथा तसेच संत वचनांचे दाखले देत मानवी जीवनात पूर्वीपासून चालत आलेली गुरू- शिष्य परंपरे विषयी मार्गदर्शन केले. यावेळी श्री रानडे यांनी देव हा चराचरात आणि प्रत्येक सजीवात असतो. देवाशी आपल्याला जोडणारा दुवा म्हणजे आपला गुरू असतो. देव पाहण्याची, ओळखण्याची दृष्टी गुरू देतो. गुरू आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. म्हणूनच देवापेक्षाही गुरू श्रेष्ठ असल्याचे रानडे म्हणाले यावेळी नरोना यांनी ही मार्गदर्शन केले

यावेळी सम्राट राजे, सृष्टी आचरेकर, खुशी मलये, श्रीकांत घोडके, लिशा सावंत, पूर्वा आरोंदेकर, खुशी आंबेरकर, साक्षी तरवडकर, भावेश वराडकर, समर्थ साळगावकर या विद्यार्थ्यांनी गुरू विषयी विचार मांडत त्यांचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. देसाई व कु. सर्वांगी हातणकर हिने केले. आभार शिक्षिका सुनंदा वराडकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page