रस्त्यावरील उखडलेली खडी ग्रामस्थांनी केली बाजूला

⚡मालवण ता.१३-: मालवण कसाल मार्गावरील कुंभारमाठ जरीमरी उतारावरील रस्ता उखडून खडी रस्त्यावर पसरल्याने हा रस्ता धोकादायक बनला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनीच श्रमदान करत रस्त्यावर पसरलेली खडी बाजूला करत रस्ता मोकळा केला आहे.

कुंभारमाठ जरीमरी घाटीतील उताराच्या रस्त्यावरील खडी उखडून गेल्याने रस्ता खड्डेमय बनला आहे. या खड्ड्यामुळे तसेच खडीवर घसरून अपघात घडत आहेत. रिक्षा, दुचाकी वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधुनही कार्यवाही होत नसल्याने अपघात टाळण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत रस्त्यावर परसलेली खडी श्रमदानातून बाजूला करत रस्ता मोकळा केला. यामध्ये महेश मयेकर, मोहन वराडकर, प्रसाद परुळेकर, अवधुत परुळेकर व इतर सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page