विविध कार्यक्रमांतून गुरुंना मानवंदना

⚡वेंगुर्ला ता.१३-: आषाढी एकादशीपासून सुरु झालेल्या चातुमार्सातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. हिंदु धर्मात गुरुला देवा इतकेच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. त्यानिमित्त वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

  यावेळी मुलांनी गुरू, माता, पिता या विषयावर सुंदर गीते सादर केली. मुलांनी एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्य यांची नाटिका सादर करून गुरुंना मानवंदना दिली. मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर यांनी मुलांना जीवनातील गुरुचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
You cannot copy content of this page