दांडेली आरोस बाजार मधील रस्ता धोकादायक

वाहन रुतण्याची शक्यता : प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन : संजू पांगम

⚡बांदा ता.१३-: चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे दांडेली आरोस बाजार मधील रस्ता पाईपलाईन खोदाई केलेल्या बाजूने पूर्णपणे खचला. एसटी बसेस तसेच अन्य वाहतूक या मार्गाने होत असल्याने वाहन रुतून अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देत उपाययोजना करावी अन्यथा कोणत्याही क्षणी आंदोलन छेडू असा इशारा दांडेली माजी सरपंच संजू पांगम यांनी प्रशासनास दिला.

तसेच या ठिकाणी अपघात झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page