संजय माळकर यांचा अनोखा संकल्प

दहा दिवसांत रस्त्यावरील २५० प्लास्टिक बॉटल केल्या जमा;आज झाली सांगता

⚡सावंतवाडी ता.१३-: ३जुलै पासून १० दिवस रस्त्यावरील किमान ५ प्लास्टिक बॉटल जमा करण्याचा संकल्प करण्यात आला होता. या उपक्रमात संजय माळकर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यांनी काल पर्यंत सुमारे २५० हुन जास्त बॉटल जमा केल्या असून, त्यांनी आज या उपक्रमाची सांगता केली आहे.

या जमा केलेल्या बॉटल त्यांनी लाखे वस्तीतील कचरा वेचणाऱ्या महिलांना देण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी शाल श्रीफळ आणि तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार केला

You cannot copy content of this page